Team MyPuneCity –टपरी मध्ये सिगारेटच्या (Nigdi)रिकाम्या पाकिटातून गांजा विक्री करणाऱ्या टपरी चालक तरुणाला निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (11 मे) दुपारी प्राधिकरणातील साई पान दरबार या टपरीवर करण्यात आली.
ऋषिकेश विठ्ठल खरात (22, पिंपरी गाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दीपक पिसे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
SSC Result : दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता होणार जाहीर
Pushpalata D. Y. Patil Hospital: आंबी येथे लवकरच सुरु होणार भव्य ‘पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश खरात याची प्राधिकरण येथे पान टपरी आहे. त्याने सिगारेटच्या रिकाम्या पाकिटात लहान पिशव्यांमधून गांजाची विक्री केली. याबाबत निगडी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी टपरीवर कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी 13 हजार 300 किमतीचा 266 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.