Team MyPuneCity – एकाच कामाच्या दोन वर्क ऑर्डर काढून काम केलेल्या कंपनीला पैसे न देता इतर कंपनीला पैसे देत व्यावसायिकाची दोन कोटी सहा लाख ९४ हजार १९८ रुपयांची फसवणूक केली. ही घटना फेब्रुवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत बीएनसी पावर प्रोजेक्ट बावधन येथे घडली.
Pushpalata D. Y. Patil Hospital: आंबी येथे लवकरच सुरु होणार भव्य ‘पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल’
निखिल ओमप्रकाश राय (28, रांजणगाव) यांनी याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बीएनसी पावर प्रोजेक्ट कंपनीचे संचालक राजेश प्रकाश चौधरी, गिरीश भागवत चौधरी, यशोधन नामदेव चौधरी, नानासाहेब मारुती निकम, जितेंद्र गरुड, निलेश मतकर आणि सीताई एंटरप्राईजेसचे मयूर साखरे आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangurdi Road : इंदोरी ते सांगुर्डी रस्त्याच्या ₹ ७.६४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून एकाच कामाच्या दोन वर कॉर्डर काढल्या. संबंधित काम फिर्यादी निखिल राय यांच्याकडून करून घेतले. मात्र त्याचा परतावा मयूर साखरे याला देऊन फिर्यादी यांची दोन कोटी सहा लाख ९४ हजार १९८ रुपयांची फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.