Team MyPuneCity – धारदार शस्त्राने वार करत तरुणीची हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी (11 मे) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास वाल्हेकरवाडी चिंचवड (Chinchwad Murder) येथे घडली.
कोमल भरत जाधव (18, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
Moshi Fire : मोशीच्या लक्ष्मी चौकात १० दुकानांना आग
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील कृष्णाईनगर मध्ये रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोमल जाधव या तरुणीवर धारदार शस्त्राने वार (Chinchwad Murder) केले. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Sangurdi Road : इंदोरी ते सांगुर्डी रस्त्याच्या ₹ ७.६४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन