Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथे कारवाई करत 13.806 किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे कारवाई शनिवारी (10 मे) दुपारी केली.
Dehuroad Crime News : इमारतीच्या जिन्यात गांजा विक्रीच्या तयारीत असलेला आरोपी अटकेत; ४६ हजारांचा गांजा जप्त
किशोर मुरलीधर चक्कर (30, लोहगाव), संतोष प्रकाश दाभाडे (37, चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय दौंडकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune Crime News 11 May 2025 : बनावट कपडे विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडमुखवाडी येथे दोघेजण गांजा विक्रीसाठी आले असल्याची माहिती आमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन संशयित रिक्षा आणि दुचाकी ताब्यात घेतली. तपासणी केली असता त्यामध्ये 13.806 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, दोन वाहने, दोन मोबाईल फोन असा एकूण 10 लाख 40 हजार 300 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. तसेच वाहन चालक किशोर आणि संतोष या दोघांना अटक केली.