Team MyPuneCity –आळंदी मध्ये ३ मे ते १० मे रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सोहळा ७५० वा निमित्त भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.चाकण रोड येथे भाविकांसाठी भव्य मंडप उभारणी करण्यात आली होती.
येणाऱ्या भाविकांसाठी मोफत निवासाची व्यवस्था देवस्थांनकदून ठिकठिकाणी करण्यात आली होती. या पारायण सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून विविध ठिकाणा वरुन हजारो भाविक आळंदी मध्ये दाखल झाले होते.ते भाविक काल दि.१० रोजी सायंकाळी आप आपापल्या गावी परतले आहेत.
Pushpalata D. Y. Patil Hospital: आंबी येथे लवकरच सुरु होणार भव्य ‘पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल’
काल दि.१० रोजी या कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. तद्नंतर दुपारी भाविकांसाठी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.त्यानंतर सायंकाळी ते त्यांच्या गावी परतले. काल रात्री वादळी वाऱ्यासह रात्री आठच्या सुमारास आळंदीत पावसाने जोरदार हजेरी लावली होती.पावसामुळे व तसेच तेथील मंडपाच्या पत्र्या वरील पाणी पडून तेथील परिसर काहीश्या प्रमाणात चीखलमय झालेला दिसून येत होता.
आदल्या दिवशीच दि.९ रोजी वडगांव घेनंद , भोसे व इतर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दि.९ रोजी श्रींचा रथोत्सव व इंद्रायणी घाटावर दिपोत्सवाचे आयोजन केले होते. पावसाची आजूबाजूची शहरांची व गावांची परिस्थिती पाहता माऊलींच्या कृपेने सर्व सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.असे मते अनेकांनी यावेळी मांडली.माऊलींच्या सोहळ्या साठी आलेले भाविक स्वयंशिस्तिने स्वच्छ्ता करून दिसत होते.निवास व्यवस्था,पार्किंग व्यवस्था ,भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी टँकर व्यवस्था,भाविकांसाठी स्नान व स्वच्छता गृहे,आरोग्य सुविधा इ.बाबत भाविक संतुष्ट होते. सोहळ्याची सांगता झाल्याने सद्यस्थितीत मंडप काढणीची लगबग सुरू आहे.
