Team MyPuneCity – पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक (Pune) उपाययोजना केली (Pune) आहे. विशेष शाखेचे पोलीस उप-आयुक्त मिलिंद मोहिते यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (२) (३) अन्वये दिनांक १३ मे २०२५ पासून ते २६ मे २०२५ पर्यंत १४ दिवसांसाठी संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
Pimpri News : देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले – नितीन बानगुडे पाटील
पुणे शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्यावतीने अनेकदा मोर्चे, धरणे, निदर्शने आणि बंदसारख्या आंदोलनांचे आयोजन केले जाते. याशिवाय, अतिक्रमण हटावण्याच्या कारवायांसारख्या विविध कारणांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला (Pune) आहे.
या आदेशानुसार, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पुढील गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे:
- कोणताही दाहक पदार्थ, स्फोटक पदार्थ किंवा ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.
- दगड, शस्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची हत्यारे आणि ती जमा करणे किंवा तयार करणे.
- शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका(Pune) आणि शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
- कोणत्याही व्यक्तीचे चित्र, प्रतिकात्मक प्रेत, नेत्यांचे चित्र किंवा प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.
- मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, सार्वजनिक टीका करणे, उच्चार गाणी गाणे किंवा वाद्य वाजवणे.
- शालीनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे, ज्यामुळे सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्याला धोका निर्माण होऊ शकेल.
- सभ्यता आणि नीतिमत्तेला धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल अशा आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा हावभाव करणे आणि अशा आशयाचे कोणतेही साहित्य तयार करून त्याचा प्रसार (Pune) करणे.
- ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) चे उल्लंघन करणारे कोणतेही (Pune) कृत्य करणे.
- पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे, सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे.
या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, शासकीय सेवेतील व्यक्ती आणि ज्यांना कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना हा आदेश लागू होणार नाही. तसेच, खाजगी सुरक्षा रक्षक, गुरखा किंवा चौकीदार जे ३.५ फुटांपर्यंत लांबीच्या लाठ्या बाळगत आहेत, त्यांनाही हा (Pune) आदेश लागू नसेल.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ नुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन (Pune) केले आहे.