Team MyPuneCity –पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी (9 मे) दिवसभर ढगाळ वातावरण आणि सौम्य स्वरूपाचा पाऊस पडला. हवामानात झालेल्या या बदलामुळे तापमानातही चढ-उतार दिसून आले. शुक्रवारी किमान तापमान 23.4 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 33.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं.
या हवामानाच्या परिणामस्वरूप वादळामुळे शहरात विविध भागांमध्ये झाडपडीच्या घटना समोर आल्या असून, एकूण बारा ठिकाणी झाडे पडल्याची नोंद झाली आहे. चिखली आणि रहाटणी येथे प्रत्येकी तीन ठिकाणी, थेरगाव आणि पिंपरी येथे प्रत्येकी दोन ठिकाणी तर पिंपळे निलख आणि हिंजवडी येथे प्रत्येकी एका ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने घटनांमध्ये कुठेही जीवित हानी झाली नाही.
MP Shrirang Barne : तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकसाठी राज्य सरकारचा निधी द्या; खासदार श्रीरंग बारणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महानगरपालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि झाडं हटवण्याचे काम हाती घेतलं. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे, विशेषतः ढगाळ वातावरण आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर झाडांच्या आसपास वाहनं पार्क न करण्याची सूचना देण्यात आली आहे.