situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News: ट्रेडिंगच्या बहाण्याने ४४.५० लाखांची फसवणूक करणाऱ्यास सायबर पोलिसांकडून अटक

Published On:

Team MyPuneCity – काळेवाडी पोलिस ठाणे येथे दाखल असलेल्या शेअर ट्रेडिंग फसवणुकीच्या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका आरोपीला अटक केला आहे. फिर्यादी व्यक्तीची तब्बल ४४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. अक्षय राजेंद्र बनेकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी यांना विशाल (व्हॉट्सअॅप क्र. 6376786960) व ‘ट्रेडिंग मॅनेजर’ दिव्या भट (व्हॉट्सअॅप क्र. 8528341829) यांनी ‘VIP N3 Stock Market Success Strategies Group’ या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर ‘Creation Investments FPI LLC’ या बनावट कंपनीचे अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले गेले. त्यातून शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळेल असे सांगून फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ४४.५० लाख रुपये जमा करून घेण्यात आले.

अ‍ॅपवर २ कोटी रुपयांचा बनावट नफा दाखवून तो काढण्यासाठी १५ टक्के (सुमारे ३० लाख रुपये) अधिक मागितले गेले. तेव्हा फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तक्रार नोंदवली. तपासादरम्यान आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांचा मागोवा घेतला असता, JEWEL THRRONE AGROCORP PVT. LTD. नावाच्या खात्यात पैसे वर्ग झाल्याचे उघडकीस आले. हे खाते अक्षय राजेंद्र बनेकर आणि गणेश चंद्रकांत थोरात यांच्या नावावर आहे. पुण्यातील बाणेर परिसरातून अक्षय राजेंद्र बनेकर याला अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्यातील सहभाग कबूल केला आहे.

MP Shrirang Barne : तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकसाठी राज्य सरकारचा निधी द्या; खासदार श्रीरंग बारणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस अंमलदार परशुराम चव्हाण, सुरज शिंदे, दीपक भोसले, नितेश बिच्चेवार, अतुल लोखंडे, श्रीकांत कबूले, दीपाली चव्हाण यांनी केली.

Follow Us On