situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chihcwad Crime News 9 May 2025 : डेबिट कार्डची माहिती घेऊन सव्वा लाखांची फसवणूक

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 18 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – एका व्यक्तीचे डेबिट कार्ड एटीएम मध्ये अडकल्यानंतर मदतीच्या बहाण्याने बँक खात्याची माहिती मिळवून एक लाख २४ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्‍यात आली. ही घटना १५ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजताच्‍या सुमारास नखातेवस्‍ती, रहाटणी येथे (Pimpri Chihcwad Crime News 9 May 2025) घडली.

याबाबत एका ४७ वर्षीय व्यक्तीने गुरुवारी (८ मे) काळेवाडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एटीएममध्‍ये गेलेल्‍या एका व्यक्तीचे डेबिट कार्ड मशिनमध्‍ये अडकले. त्यानंतर त्यांनी एका हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला. फोनवरील व्यक्तीने फिर्यादीस एटीएम मशीनवर काही बटणे दाबण्यास सांगून त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्याद्वारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून एक लाख २४ हजार ५०० रुपये काढून घेत फसवणूक केली.

Pimpri News : पिंपरीत सापडले बॉम्ब शिल्ड


जागेच्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न (Pimpri Chihcwad Crime News 9 May 2025)

जागेच्या वादातून महिला व तिच्या मुलाला मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना वाकड परिसरातील रमाबाई आंबेडकर नगर येथे गुरुवारी (८ मे) सकाळी पावणे बारा वाजताच्‍या सुमारास घडली.

याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋतिक ढसाळ, गौरव ढसाळ, सुनिल ढसाळ, रोहित सोनवणे, मोहित सोनवणे आणि सोनू (पूर्ण नाव, पत्‍ता माहिती नाही) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करीत आमची जागा खाली करा, असे म्‍हणत फिर्यादी आणि त्यांच्या मुलास शिवीगाळ करत सिमेंटचे गट्टू डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. भांडण सोडविण्यास आलेल्या दोन महिलांनाही आरोपींनी मारहाण केली.


महाळुंगे येथे दोन अपघातांमध्ये एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी (Pimpri Chihcwad Crime News 9 May 2025)

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताच्या दोन घटना घडल्या. पहिला अपघात पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे घडला. तर दुसरा अपघात महाळुंगे गावात इंडोरंस चौक ते निघोजे रोडवर घडला. या अपघतांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

पहिल्या अपघातात प्रशांत गंगाधर तापकीर (३१, मोशी), स्वप्नील पंडीत पांचाळ (३१, मोशी) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी प्रशांत यांचे नातेवाईक विकास शिवाजी खकाळ (३५, चऱ्होली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एनएल ०१/एन ६७५२) चालकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सव्‍वानऊ वाजताच्‍या सुमारास तापकीर आणि पांचाळ हे दोघेजण दुचाकीवरून कामावर चालले होते. ते कुरुळी गावच्या हद्दीत पुणे-नाशिक रोडवरील चिंबळी फाटा येथे आले असता समोरून आलेल्या कंटेनरने डिव्हायडर क्रॉस करून तापकीर यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तापकीर आणि पांचाळ या दोघांच्‍या दोन्‍ही पायांचे हाड मोडले आहे. तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

दुसरा अपघात महाळुंगे गावात घडला. यामध्ये संतोष नारायण खैरे (४४, खालूंबरे, खेड) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे नातेवाईक संतोष नारायण खैरे (वय ४४, रा. खालुंब्रे, ता. खेड) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. राजेंद्र ज्ञानदेव धस (५८, चिंचवड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकर (एमएच १४/एएस ९२९५) चालकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आठ वाजताच्‍या सुमारास खैरे हे दुचाकीवरून कामाला चालले होते. महाळुंगे येथे आल्यानंतर पाठीमागून आलेल्‍या टँकरने त्‍यांना जोरदार धडक दिली. या अपघातात खैरे हे गंभीर जखमी होऊन त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यू झाला.

Maval News : मावळ मनसेचा मोठा पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर….इंजिन थांबवून तुतारी फुंकणार ?


दोन कारवायांमध्ये गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक, एक किलो गांजा जप्त (Pimpri Chihcwad Crime News 9 May 2025)

भोसरी आणि संत तुकाराम नगर येथे  पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ९७४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये तिघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे.  

भोसरी परिसरात पुणे-नाशिक महामार्गावर एका ५१ वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडून २० हजार ७०० रुपये किमतीचा ४१४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ५१ वर्षीय महिलेला अटक करत तिच्यासह आणखी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई संत तुकाराम नगर पिंपरी येथे करण्यात आली. विजय लक्ष्मण साळुंखे (२१, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५६० ग्रॅम गांजा आणि ८०० रुपये रोख रक्कम असा एकूण २८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. विजय हा संत तुकाराम नगर येथे गांजा विक्रीसाठी आला असता ही कारवाई करण्यात आली.

Follow Us On