Team MyPuneCity – माहेश्वरी सहेली महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या,अध्यक्षा विजया बांगड़ व नीता बिहानी यांच्या संकल्पनेवर आधारित ‘समुद्र मंथन’ या भव्य पौराणिक नृत्यनाटिकेच्या सादरीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व उपस्थित पुणेकर भारावून गेले ! कार्यक्रमाचे नियोजन,प्रस्तुती’ऑयस्टर इव्हेंट ‘च्या संयोजिका दीपा बाफना व कविता खिंवसरा यांनी केले.१५० पेक्षा जास्त महिला कलाकारांना योग्य प्रशिक्षण देऊन,उत्तम संवादलेखन,कलात्मक कोरियोग्राफी,ध्वनि मुद्रण,वीडियो ग्राफिक्स,आकर्षक प्रॉप्स व टेक्नीकल इफेक्ट्सद्वारे भव्यदिव्य व अंगावर शहारे आणणारा पौराणिक नृत्य नाटिकेचा समुद्र मंथन हा कार्यक्रम सादर करण्यात आला.योगेश फूलफगर,प्रणव पद्मनाभ,अनिरुद्ध पद्मनाभ,शिल्पा पारेख व जागृती देसरडा-संघवी यांचे सहकार्य मिळाले. पौराणिक नृत्य नाटीकेला साजेशी अप्रतिम वेशभूषा हेमा बूब व रूपाली काबरा यांनी केली.सहेली ग्रुप च्या वतीने संगीता बिहाणी ,मीना बिहाणी व संयोजन समितीचे सहकार्य लाभले.
MP Shrirang Barne : तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकसाठी राज्य सरकारचा निधी द्या; खासदार श्रीरंग बारणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर,उद्योजक मोनिका पोफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे दि.५ मे २०२५ रोजी हा कार्यक्रम झाला. माहेश्वरी सहेली ग्रुप च्या ३५ वर्षे वाटचालीचा आढावा यावेळी घेण्यात आला.सहेली ग्रुप तर्फे अनेक सामाजिक संस्था, प्रकल्पाना यावेळी मदत देण्यात आली.पुणे जिल्हा माहेश्वरी समुदाय चे अध्यक्ष रतन राठी , महेश सोमाणी ,संजय बियाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Pune: पुणे शहरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर प्रतिबंध; विमान अपघाताची शक्यता
भव्य नृत्य नाट्याने भारावले पुणेकर !
माहेश्वरी सहेली ग्रुप आयोजित च्या ‘समुद्र मंथन’ या भव्य नृत्यनाटिकेच्या सादरीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला. उपस्थित पुणेकर भारावून गेले ! देव-दानवांच्या युद्धात अमृतप्राप्तीसाठी केलेले समुद्र मंथन या नाट्यात अतिशय परिणामकारकरीत्या दाखविण्यात आले.फक्त महिलांनी ते सादर केले आणि वाहवा मिळवली. दोन महिने माहेश्वरी ग्रुपने सादरीकरणासाठी मेहनत घेतली होती.१५० पेक्षा जास्त महिला कलाकारांना योग्य प्रशिक्षण देऊन,उत्तम संवादलेखन,कलात्मक कोरियोग्राफी,ध्वनि मुद्रण,वीडियो ग्राफिक्स,आकर्षक प्रॉप्स व टेनिकल इफेक्ट्सद्वारे भव्यदिव्य व अंगावर शहारे आणणारा पौराणिक नृत्य नाटिकेचा समुद्र मंथन हा कार्यक्रम सादर करण्यात आला.’ऑयस्टर इव्हेंट’च्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.