Team MyPuneCity – पिंपरी येथे रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (९) दुपारी जुने दोन बॉम्ब शेल आढळून आले. भारत-पाकिस्तान मध्ये युद्धाचा तणाव वाढत ( Pimpri News) असताना हे बॉम्ब शेल आढळल्याने शुक्रवारी शहरात एकच खळबळ उडाली.
पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या भंगारच्या दुकानाजवळ शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास जुने बॉम्ब शेल आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस, बॉम्ब शोधक नाशक पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ धाव घेतली. बॉम्ब शोधक नाशक पथकाने बॉम्ब शेलची पाहणी करून ते ताब्यात घेतले आहे.
Pune: पुणे शहरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर प्रतिबंध; विमान अपघाताची शक्यता
पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. मात्र आणखी बॉम्ब शेल अथवा इतर संशयित वस्तू आढळून आल्या नाहीत. आढळलेले बॉम्ब शेल पुढील तपासणीसाठी संरक्षण विभागाकडे दिले जाणार आहे. हे पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात सातत्याने अशा प्रकारचे बॉम्ब शेल आढळून येतात. शुक्रवारी आढळलेले बॉम्ब शेल भांगरमध्ये चोरट्या पद्धतीने ( Pimpri News) आणले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या भारत-पाकिस्तान युद्धाचा तणाव वाढत आहे. देशभर सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी उपायोजना केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी पिंपरी येथे युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रील घेण्यात आले. हे मॉकड्रील यशस्वी झाल्यानंतर सर्व यंत्रणा युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात हे बॉम्ब शेल आढळल्याने शहरात ( Pimpri News) खळबळ उडाली.