Team MyPuneCity – एकाच कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास तिच्या सहकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली. ही घटना बालाजीनगर, भोसरी येथे घडली. याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भोसरी येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेने गुरुवारी (८ मे) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद दिली( Bhosari Crime News) आहे.
Alandi : श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सोहळ्यातील भावर्थांचे बहुरूपी भारुड भाविकांना भावले
पोलिसांनी ताजणे मळा, चऱ्होली येथे राहणारी महिला (३४) आणि बालाजीनगर झोपडपट्टी येथे राहणारी दुसरी महिला (४५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Talegaon Dabhade : उदयसिंह निंबाळकर यांची मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी महिला भोसरी येथे एकाच कंपनीत काम करतात. फिर्यादी महिलेचा पगार न झाल्याने त्याबाबत विचारण्यासाठी त्याने आरोपींकडे गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी महिलांनी फिर्यादी ( Bhosari Crime News) यांच्याबाबत तसेच त्यांच्या जातीबाबत बोलून त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली.