Team MyPuneCity – पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दशहतवाद्यांचा हिशेब चुकता करण्यासाठी देशाने ऑपरेशन ‘सिंदूर राबविले. या पाकवरच्या यशस्वी हल्ल्यानंतर भारतीय जनता पार्टी आळंदी शहर यांच्या तर्फे फटाके फोडत जल्लोष करण्यात आला आहे.
अनेकींचा ‘कुंकू’ पुसणाऱ्या दहशवादी वृत्तीचे ऑपरेशन ‘सिंदूर’ने यशस्वी केल्याची भावना यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने मध्यरात्री दहशतवाद्यांचे एकूण ९ अड्डे उद्ध्वस्थ केले.
Operation Sindoor : लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यासह सांगितले ‘ ऑपरेशन सिंदूर’ कसे राबिवले
भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ही कारवाई केल्याने फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.व महाद्वार चौकात येथे कार्यकर्त्यांनी एकत्र येत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘भारतीय लष्कराचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.