situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 6 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Updated On:
Rashi Bhavishya 16 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग. आजचा दिवस – मंगळवार. तारीख – ०६.०५.२०२५ (Rashi Bhavishya 6 May 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी ३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- मघा १५.५२ पर्यंत नंतर पूर्वा फाल्गुनी.
चंद्र राशी – सिंह.
—————————-
मेष- (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 6 May 2025
उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. प्रेम प्रकरणांना थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळू शकतील.

rans4d

वृषभ (शुभ रंग- चंदेरी)
कौटुंबिक सदस्यात सुसंवाद राहील. मुलांची अभ्यासातील गोडी वाढेल. आज गृह सौख्याचा दिवस असून मातोश्री कडून लाभ होईल. जागेचे व्यवहार यशस्वी होतील.

मिथुन (शुभ रंग – मोतिया)
राशीच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणारा चंद्र तुमच्या पराक्रमात वृद्धी करणार आहे. आज तुम्ही चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्याल. भावंडांशी सलोखा वाढेल.

कर्क ( शुभ रंग- लाल)
अत्यंत आत्मविश्वासाने घराबाहेर पडाल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने मनोबल उत्तम राहील. कार्यक्षेत्रात काही आव्हानांना तुम्ही धैर्याने तोंड द्याल.

Maval: मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के;निकालात मुलींची सरशी

सिंह ( शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 6 May 2025
आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्थी कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत ठामपणे मांडाल. योग्य वेळी तुम्ही योग्य निर्णय घ्याल.

कन्या (शुभ रंग- पिस्ता)
राशीच्या व्यवस्थानातून चंद्राचे भ्रमण सुरू असताना जमाखर्चाचा तराजू डळमळीत होईल. असलेला पैसा जपून वापरायला हवा. प्रवासात मौल्यवान ऐवज जपावे.

तूळ (शुभ रंग- डाळिंबी)
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुम्हाला कार्यक्षेत्रात केलेल्या तुमच्या कष्टांची फळे मिळतील. यश दृष्टिक्षेपात येईल. आप्तस्वकीय तुमच्या शब्दाला मान देतील.

वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)
मोठ्या लोकांमध्ये असलेली तुमची उठ बस तुमच्या व्यवसाय वृद्धीच्या कामी येईल. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणार आहात.

Pune: हास्ययोग चळवळ समाजाला सकारात्मक, सुदृढ बनवतेय-चंद्रशेखर बावनकुळे

धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 6 May 2025
ज्येष्ठ मंडळींचा देवधर्माकडे कल वाढेल. गृहिणी यथाशक्ती दानधर्म करतील. आजी आजोबा नातवंडात रमतील. संध्याकाळी सत्संगात रमणेच हिताचे राहील.

मकर (शुभ रंग- क्रीम)
आज काम कमीच आणि दगदगच जास्त होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे समाधान होणे कठीण. आज गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. प्रलोभने टाळायला हवीत.

कुंभ ( शुभ रंग- गुलाबी)
आज वैवाहिक जोडीदाराशी चांगले सूर जुळतील. धंद्यात भागीदारांबरोबर एकमत राहील. मोठे व्यावसायिक करार यशस्वी होतील. सकारात्मकता वाढेल.

मीन ( शुभ रंग – भगवा)
आज सर्वात आधी तब्येतीची काळजी घ्यायला हवी. काही जुने आजार डोके वर काढू शकतील. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेतलेला बरा.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On