Team MyPuneCity – बाली इंडोनेशिया ट्रिपचे तिकीट, हॉटेल बुक करण्याच्या बहाण्याने पैसे घेत १० लाख ८८ हजार ९०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १४ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत निगडी येथे घडली.
दीपक साहेबराव वाघ (४१, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार युनिव्हर्स पेसेज इंडिया प्रा. ली या ट्रॅव्हल्स एजन्सीच्या संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक वाघ आणि त्यांच्या मित्रांनी बाली इंडोनेशिया येथे कुटुंबासह फिरायला जाण्यासाठी युनिव्हर्स पेसेज इंडिया प्रा. ली. या ट्रॅव्हल्स एजन्सीकडे बुकिंग केले. एजन्सीच्या प्रतिनिधींनी दीपक आणि त्यांच्या मित्रांकडून तिकिटे आणि हॉटेल बुकिंगसाठी १० लाख ८८ हजार ९०० रुपये घेत त्यांचे बुकिंग न करता फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
HSC Exam Result : उद्या जाहीर होणार 12 वीचा निकाल; या संकेतस्थळांवर पहा तुमचा निकाल





















