Bhosari Crime News : भोसरीमध्ये दहा ते पंधरा वाहनांची तोडफोड

Updated On:
Bhosari Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity – भोसरी मधील आदिनाथनगर गव्हाणे वस्ती येथे सोमवारी (21 एप्रिल) पहाटे एक वाजताच्या सुमारास दहा ते पंधरा वाहनांची तोडफोड करण्यात आली. दोन तरुणांनी वाहनांच्या काचा फोडून वाहनांचे मोठे नुकसान ( Bhosari Crime News ) केले आहे.

आदिनाथनगर गव्हाणे वस्ती येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांना दोन तरुणांनी निशाणा केला. परिसरात दहशत पसरविण्यासाठी तरुणांनी तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली ( Bhosari Crime News ) आहे.

Follow Us On