situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ravindra Dhangekar : खटला चालू असताना समीर पाटील यांच्याबाबत कोणतेही वक्तव्य करू नका;न्यायालयाचा रवींद्र धंगेकरांना निर्देश

Updated On:
Ravindra Dhangekar

Team My Pune City – पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ ( Ravindra Dhangekar) प्रकरणात चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक समीर पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर अडचणीत आले आहेत. समीर पाटील यांनी धंगेकरांविरोधात दाखल केलेल्या मानहानी आणि अब्रुनुकसानीच्या खटल्यात न्यायालयाने धंगेकरांना दणका दिला असून, खटला चालू असताना समीर पाटील यांच्याबाबत कोणतेही वक्तव्य करू नका, अशा स्पष्ट सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

Talegaon Municipal Council Election : घड्याळ आणि कमळ चिन्हवाल्यांनाच पाठिंबा; तळेगाव नगरपरिषदेची राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

रवींद्र धंगेकर यांनी काही महिन्यांपूर्वी निलेश घायवळ या गुन्हेगाराच्या ( Ravindra Dhangekar) संदर्भात वक्तव्य करताना वारंवार समीर पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांनी माध्यमांसमोर केलेल्या आरोपांत समीर पाटील यांचे “गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहेत” तसेच “त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे” असे म्हटले होते. धंगेकरांनी यासंदर्भात काही छायाचित्रे आणि कागदपत्रेही सादर केली होती. मात्र, हे आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा समीर पाटील यांनी केला होता.

Suryakant Yewale : “अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका – विजय कुंभार

या पार्श्वभूमीवर समीर पाटील यांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी रवींद्र धंगेकरांना ( Ravindra Dhangekar) ५० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी २७ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, धंगेकरांकडून न्यायालयात कोणतेही प्रतिउत्तर सादर करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे.

समीर पाटील यांच्या मते, धंगेकरांनी कोणतेही ठोस पुरावे सादर ( Ravindra Dhangekar) केले नाहीत. त्यामुळेच न्यायालयाने प्राथमिक सुनावणीदरम्यान धंगेकरांना पुढील आदेश देईपर्यंत समीर पाटील यांच्या संदर्भात कोणतेही सार्वजनिक वक्तव्य किंवा आरोप करू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत.

या न्यायालयीन निर्देशांमुळे पुणे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. कारण, निलेश घायवळ प्रकरणावरून आधीच काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता ( Ravindra Dhangekar) राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Follow Us On