Team My Pune City – दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटनेशी ( Juber Hangargekar) संबंधित असल्याच्या संशयावरुन राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नुकतीच अटक केलेल्या कोंढव्यातील संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याची कसून चौकशी केली जात आहे.
PMC : पुणे महापालिकेत मोठा फेरबदल : उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल, नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
एटीएसच्या पथकाने यापूर्वी कोंढवा, वानवडी आणि खडकी परिसरात ९ ऑक्टोबर रोजी छापे टाकले होते. त्यानंतर हंगरगेकर फरार झाला होता. त्यानंतर जुबेरला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते.
या प्रकरणाशी संबंधित काही संशयितांची ( Juber Hangargekar) मुंब्रा भागातही चौकशी करण्यात आली आहे. तपासादरम्यान हंगरगेकरकडून मोबाइल फोन, लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करण्यात आली आहेत. एटीएसच्या तपासात उघड झाले आहे की, त्याच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवेत आणि ओमान येथील पाच व्यक्तींचे संपर्क क्रमांक आढळले आहेत. या व्यक्तींच्या पार्श्वभूमीची तपासणी सुरू असून, त्यांच्या माध्यमातून काही संवेदनशील माहितीचा आदानप्रदान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हंगरगेकरला अटक झाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी दहशतवादी विचारसरणीची पुस्तके आणि कागदपत्रे जाळल्याची माहिती तपासात समोर आली आहे. हे दस्तऐवज काळेपडळ येथील एका मदरशाच्या मोकळ्या जागेत नष्ट केल्याचे समजते. त्याच्या लॅपटॉपमधून संशयास्पद पीडीएफ फाइल्स आणि सांकेतिक संवाद आढळले असून, एटीएसचे सायबर तज्ज्ञ त्याचे तांत्रिक विश्लेषण करत आहेत. याशिवाय, त्याच्या एका साथीदाराच्या घरातून २ लाख ३५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या रकमेचा स्रोत आणि उद्देश तपासला जात ( Juber Hangargekar) आहे.


















