Team My Pune City – अश्विन मेडिकल फाऊंडेशनच्या मोरया मल्टिस्पेशालिटी ( Morya Hospital) हॉस्पिटलतर्फे ३०० यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याचा उत्सव सोहळा रविवारी, दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.४५ वाजता रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.
PMC : पुणे महापालिकेत मोठा फेरबदल : उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल, नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार शंकरभाऊ जगताप ( Morya Hospital) असतील. विशेष उपस्थिती म्हणून चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, दिलीप सोनिगरा ज्वेलर्सचे प्रमुख दिलीप सोनिगरा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघाचालक विनोद बन्सल, तसेच औंध जिल्हा रुग्णालयातील सिविल सर्जन डॉ. नागनाथ यमपल्ले उपस्थित राहणार आहेत.
PMPML : पुणे आणि पिंपरी-चिंचवडला मिळणार 1000 ई-बस; सार्वजनिक वाहतुकीला नवा वेग
या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज मोरया हॉस्पिटलमध्ये( Morya Hospital) आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी सविस्तर माहिती दिली. त्यावेळी रुग्णालयाच्या प्रशासन अधिकारी सारिका मोरे, कर्मचारी प्रतिनिधी विश्वस्त भगवान तांबे व सामाजिक कार्यकर्ते संजय कुलकर्णी उपस्थित होते.
त्यांनी सांगितले की, “कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया म्हणजे ( Morya Hospital) विज्ञान, करुणा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम आहे. या शस्त्रक्रियेद्वारे जन्मतः कर्णबधिर असलेल्या मुलांना पुन्हा ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता प्राप्त होते. जन्मतः कर्णबधिर असणाऱ्या मुलांचे प्रमाण 1000 मुलांमध्ये दोन ते चार इतके असते.”
मोरया हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील ( Morya Hospital) कर्णबधिर मुलांसाठी आशेचा किरण ठरले आहे. या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे ८ ते ९ लाख रुपयांपर्यंत जातो. मात्र, अनेक गरजू पालकांना तो परवडत नसल्याने प्रशासन, हॉस्पिटल, विविध देणगीदार आणि सरकारी योजनांच्या मदतीने अशा मुलांना पुन्हा ऐकण्याच्या जगात आणले जात आहे.
अलीकडेच परसिस्टंट फाउंडेशन, फिनोलेक्स केबल्स, लायन्स क्लब, रोटरी क्लब, केएसबी पंप्स, मुकुल माधव फाउंडेशन, रमा पुरुषोत्तम फाउंडेशन, पंचशील फाउंडेशन, वनाज फाउंडेशन या आगळ्या-वेगळ्या सामाजिक प्रकल्पाची दखल घेत मुलांच्या ऑपरेशनसाठी आर्थिक मदत केली. डॉ. अविनाश वाचासुंदर व डॉ. अक्षय वाचासुंदर (एम.एस. ईएनटी) यांनी आतापर्यंत ३०० हून अधिक कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
त्यांनी सांगितले की, “श्रवणदोष असलेल्या मुलांवर सातत्याने ( Morya Hospital) आणि संयमाने काम करावे लागते. ENT सर्जन, ऑडियोलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट, सायकॉलॉजिस्ट, स्पेशल एज्युकेटर आणि पालक यांच्या समन्वयातूनच हे यश मिळते. आमच्या हॉस्पिटलमधील टीमवर्कमुळे अनेक मुले आज पुन्हा ऐकू व बोलू शकत आहेत, हीच आमच्यासाठी मोठी समाधानाची गोष्ट आहे.”
सध्या मोरया हॉस्पिटलमध्ये सुमारे २० मुलांना वाचा-भाषा प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र स्पेशल टीचर नेमण्यात आली असून, शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसनासाठी सातत्याने मार्गदर्शन केले जाते.
पालकांचा अनुभवही यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. नांदेडच्या सौ. कविता कुरुळे यांनी सांगितले की, “माझ्या दोन वर्षांच्या मुली ‘रुही’ला ऐकू येत नव्हते. मोरया हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रेमळपणे सर्व सांगितले आणि देणगीदारांच्या मदतीने तिचे ऑपरेशन केले. आज ती आमच्या बोलण्याला प्रतिसाद देते. ‘आई’, ‘बाबा’ म्हणते, हे आमच्यासाठी स्वप्नवत आनंद ( Morya Hospital) आहे.”
डॉ. अविनाश वाचासुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ – ऑडिओलॉजी, ओटी, रिसेप्शन, वॉर्ड, बिलिंग, सर्जन डॉक्टर, कोऑर्डिनेटर्स आणि वाचा-भाषा शिक्षक – सर्वजण समन्वयाने काम करत आहेत.
कॉक्लिअर इम्प्लांट ही अत्यंत गुंतागुंतीची पण जीवन बदलवणारी ( Morya Hospital) शस्त्रक्रिया असून, मोरया हॉस्पिटल चिंचवड येथे ती अत्यंत कुशलतेने केली जाते. या यशस्वी वाटचालीच्या ३०० शस्त्रक्रियांचा उत्सव सोहळा म्हणजे केवळ हॉस्पिटलचा नव्हे, तर अनेक कर्णबधिर मुलांना नवजीवन देणाऱ्या संवेदनशील कार्याचा गौरव आहे.






















