Team My Pune City –पुणे महापालिकेत उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये ( PMC) मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या तीन अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी उपायुक्तांच्या विभागीय जबाबदाऱ्यांचे पुनर्वाटप केले आहे. या बदलांनंतर महापालिकेच्या विविध विभागांत नवे चेहरे दिसणार आहेत.
गेल्या आठवड्यात राज्य सरकारने तुषार बाबर, आशा राऊत ( PMC) आणि संतोष टेंगले या तिघा उपायुक्तांची प्रतिनियुक्तीवर बदली केली होती. यापैकी आशा राऊत आणि तुषार बाबर यांनी महापालिकेत रुजू होऊन कामकाज सुरू केले आहे, तर संतोष टेंगले यांची नियुक्ती अद्याप प्रलंबित आहे. त्यांच्या जागी अद्याप नवीन अधिकारी रुजू झालेले नाहीत.
PMPML : पुणे आणि पिंपरी-चिंचवडला मिळणार 1000 ई-बस; सार्वजनिक वाहतुकीला नवा वेग
नव्या फेरबदलानुसार मिळकतकर विभागाची जबाबदारी रवि पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असून, मध्यवर्ती भांडार विभागाचा कारभार आशा राऊत यांच्याकडे देण्यात आला आहे. तर रविंद्र माळी यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतेच या बदलांचे ( PMC) आदेश जारी केले आहेत. या बदलांमुळे काही अधिकाऱ्यांकडे प्रमुख आणि महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी गेल्याचे दिसत असून, महापालिकेच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
Today’s Horoscope, Wednesday : आजचे राशीभविष्य – बुधवार, १२ नोव्हेंबर २०२५
निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे ( PMC) आयुक्तांचे विशेष कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. यापूर्वी मिळकतक विभाग पाहणारे अविनाश सपकाळ आता मोटार वाहन आणि पर्यावरण विभागाची जबाबदारी सांभाळतील.
फेरबदलांनुसार प्रमुख विभागांची नवी जबाबदारी पुढीलप्रमाणे आहे — ( PMC)
संदीप कदम (घनकचरा व्यवस्थापन), अविनाश सपकाळ (मोटार वाहन व पर्यावरण), आशा राऊत (मध्यवर्ती भांडार व सुरक्षा), निखील मोरे (भूसंपादन व व्यवस्थापन, परिमंडळ क्र. ५), संतोष वारुळे (परिमंडळ क्र. २, सांस्कृतिक केंद्र), प्रशांत ठोंबरे (मालमत्ता व दक्षता), सोमनाथ बनकर (अतिक्रमण निर्मूलन), अरविंद माळी (परिमंडळ क्र. ४, आपत्ती व्यवस्थापन), राहुल जगताप (ई-प्रशासन व आयटी), माधव जगताप (आकाशचिन्ह व अग्निशमन), तुषार बाबर (जनसंपर्क, सोशल मीडिया, मंडई), विजयकुमार थोरात (सामान्य प्रशासन, तांत्रिक विभाग, बीओटी सेल), संदीप खलाटे (झोपडपट्टी पुनर्वसन), विजय लांडगे (स्थानिक संस्था कर, जनगणना, जनरल रेकॉर्ड), प्रसाद काटकर (निवडणूक विभाग व विशेष कार्यकारी अधिकारी), किशोरी शिंदे (वैद्यकीय महाविद्यालय व विशेष विभाग), वसुंधरा बारवे (शिक्षण व प्रशिक्षण प्रबोधिनी), जयंत भोसेकर (समाजकल्याण, मागासवर्ग, दिव्यांग निवारण), रवि पवार (कर आकारणी, क्रीडा विभाग), आणि रमेश शेलार (सुरक्षा अधिकारी व अतिक्रमण विभाग).
या नव्या फेरबदलांमुळे महापालिकेतील प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित होत ( PMC) आहे.


















