Team My Pune City – पुणे महानगरपालिकेच्या ( PMC Election ) आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्ष महाविकास आघाडीचा घटक म्हणूनच निवडणूक लढवणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किंवा महायुतीमधील कोणत्याही पक्षाशी उघड अथवा गुप्त आघाडी केली जाणार नाही, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीतच लढण्याचा निर्धार
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पक्षाच्या ५२व्या मासिक कार्यकारिणी बैठकीत पक्षाने आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. ही बैठक पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात शहराध्यक्ष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत बोलताना जगताप म्हणाले, “नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले असले तरी ते निर्णय स्थानिक पातळीवरील आहेत. मात्र पुण्यात अशा प्रकारची कोणतीही युती होणार नाही. आम्ही महाविकास आघाडीचा भाग म्हणूनच निवडणूक लढवू. महायुतीच्या कारभारामुळे पुणेकरांनी खूप काही गमावले आहे — हा आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा ( PMC Election ) असेल.”
PMC : पुणे महानगरपालिका निवडणूक 2025 : आरक्षण सोडती जाहीर, 165 जागांसाठी स्पर्धा
धर्मांध शक्तींना विरोध — पुरोगामी शहरासाठी लढणार
अंकुश काकडे यांनीही स्पष्ट केले की, जगताप यांनी पुढे सांगितले की, “महायुतीमुळे शहरात वाहतूक कोंडी, वाढती गुन्हेगारी आणि बकालपणा वाढला आहे. त्यातच धर्मांध राजकारणाला खतपाणी घालणारे घटकपक्ष आघाडीवर आहेत. अशा शक्तींना साथ न देता पुरोगामी विचारांची पताका घेऊन आम्ही पुणे शहराला पुन्हा सुसंस्कृत, स्वच्छ आणि सुनियोजित बनवण्याचा निर्धार ( PMC Election ) केला आहे.”
उमेदवार निवड प्रक्रियेला सुरुवात
बैठकीदरम्यान पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज वाटपाचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी आमदार बापू पठारे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, प्रवक्ते अंकुश काकडे, तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडती जाहीर झाल्यानंतर पक्षांनी आपापल्या रणनीती ठरवायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने महाविकास आघाडीतून लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने आता पुण्याच्या राजकारणातील समीकरणे अधिक रंजक बनणार ( PMC Election ) आहेत.


















