Team My Pune City – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ( Elections) निवडणुकांचा बिगुल वाजला असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकींची अधिकृत घोषणा केली असून, सर्वच पक्षांनी तयारीस सुरुवात केली आहे. महायुती काही ठिकाणी एकत्र लढणार असली, तरी अनेक भागांमध्ये तीनही घटक पक्ष — भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट — स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.
PMC : पुणे महापालिका निवडणूक : प्रारूप आरक्षण सोडत उद्या जाहीर, राजकीय चित्र होणार स्पष्ट
दरम्यान, या निवडणूक वातावरणात एक नवीन राजकीय समीकरण समोर आले आहे. कोल्हापूरच्या चंदगड नगर पंचायतीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. या युतीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या युतीनंतर माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर हे दोघे मिळून निवडणूक लढवणार आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने दोन्ही गटांमध्ये चर्चा होऊन एकमत झाले. चंदगडमध्ये घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, चंदगडमधील निवडणुकीचा रंग ( Elections) अधिक चढला आहे.
राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट आणखी काही ठिकाणी एकत्र येतील का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या नव्या समीकरणाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील तणाव काहीसा कमी होणार का, हा प्रश्नही चर्चेत ( Elections) आला आहे.
दरम्यान, रविवारी शरद पवार गटाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत ओबीसी आरक्षित जागांवर मूळ ओबीसी उमेदवारांनाच प्राधान्य द्यावे, आणि जिथे उमेदवार उपलब्ध नाहीत तिथे कुणबी प्रमाणपत्रधारकांना संधी द्यावी, अशा स्पष्ट सूचना शरद पवार यांनी खासदार आणि आमदारांना दिल्या आहेत.
राज्यभरातील राजकीय समीकरणं सतत बदलत असताना, चंदगडमधील ही युती “राष्ट्रवादींच्या एकतेची पहिली पायरी” ठरेल का, याची उत्सुकता सर्व राजकीय ( Elections) वर्तुळात दिसून येत आहे.


















