Team My Pune City – पुणेकरांच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या ( PMC) दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उद्या (११ नोव्हेंबर) पडणार आहे. प्रारूप आरक्षण सोडत जाहीर होताच, शहरातील राजकीय समीकरणांना वेग येणार आहे. कोणत्या प्रभागात कोणत्या पक्षाचे दिग्गज किंवा नवे चेहरे उमेदवारीसाठी पुढे येणार, याचे स्पष्ट चित्र यानंतर दिसणार आहे. त्यामुळे माजी नगरसेवक, इच्छुक आणि राजकीय पक्षांचे लक्ष या सोडतीकडे खिळले आहे.
१६५ नगरसेवक, ४१ प्रभाग — नवा आराखडा तयार ( PMC)
आगामी निवडणुकीसाठी पुणे महापालिकेतील एकूण नगरसेवकसंख्या १६५ निश्चित करण्यात आली आहे. शहरात ४१ प्रभाग असतील, त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव–कात्रज प्रभाग पाच सदस्यीय असेल. या बदललेल्या संरचनेनुसार स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
PCU : पीसीयूचा ‘अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन’ हा उपक्रम दीपस्तंभ ठरेल – सनम अरोरा
५० टक्के महिला आरक्षण — ८३ नगरसेविका होणार ( PMC)
या निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे १६५ पैकी ८३ नगरसेविका आणि ८२ नगरसेवक अशी रचना असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आरक्षणाची प्रक्रिया चक्राकार पद्धतीने होणार असून, यामुळे मागील निवडणुकांमध्ये आरक्षित असलेल्या काही प्रभागांमध्ये यावेळी बदल दिसणार आहे.
एससी, एसटी आणि ओबीसींसाठी राखीव जागा निश्चित ( PMC)
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, सर्वप्रथम अनुसूचित जाती (SC), नंतर अनुसूचित जमाती (ST) आणि शेवटी मागासवर्गीय प्रवर्ग (OBC) यांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यापैकी एससीसाठी २२ जागा, एसटीसाठी २ जागा, तर ओबीसींसाठी ४४ जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. ही आरक्षण प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आणि संगणकीकृत प्रणालीद्वारे पार पाडली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
Maval News : मावळात महिनाभरात 50 घोणस सापांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता
सोडतीनंतर उमेदवारीचा खेळ सुरू ( PMC)
प्रारूप आरक्षण जाहीर झाल्यानंतरच राजकीय पक्ष उमेदवार निश्चित करण्याच्या हालचाली सुरू करतील. कोणता प्रभाग कोणासाठी खुला राहील, कोणत्या भागात महिलांना आरक्षण मिळेल, आणि कोणत्या ठिकाणी मोठ्या नेत्यांची गणिते बदलतील, हे उद्या स्पष्ट होणार आहे.
राजकीय वातावरण तापले
आरक्षण सोडतीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांच्या तसेच पक्ष कार्यकर्त्यांच्या अपेक्षा शिगेला पोहोचल्या आहेत. “कोणता प्रभाग खुला, कोणता राखीव?” या चर्चांनी सोशल मीडियासह राजकीय कार्यालयांमध्ये जोर धरला आहे. या सोडतीनंतर महापालिका निवडणुकीची औपचारिक रणधुमाळी सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात ( PMC) आहे.
उद्याच्या आरक्षण सोडतीनंतर पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट होणार असून, याच आधारे शहरातील पुढील राजकीय लढतीचे समीकरण ( PMC) ठरणार आहे.


















