situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

10 th And 12 th Exam 2025 : इयत्ता दहावी (SSC) आणि बारावी (HSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; उत्तीर्णतेसाठी लागणाऱ्या किमान गुणांची अट सुलभ केल्याने हजारो विद्यार्थ्यांना दिलासा

Published On:
10th 12th Exam

Team My Pune City – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) अखेर 2025 च्या दहावी ( 10 th And 12 th Exam 2025 ) (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी 2025 पासून, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. मुख्य परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.

मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी ( 10 th And 12 th Exam 2025 ) विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, परीक्षेचा ताण न घेता नियमित सराव आणि वेळेचे नियोजन केल्यास उत्तीर्ण होणे सहज शक्य आहे. “यंदाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने अधिक सुलभ करण्यात आल्या आहेत,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी पालकांनाही विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण न आणता त्यांना प्रोत्साहन आणि सकारात्मक वातावरण देण्याचे आवाहन केले.

Rupali Patil Thombre : रुपाली पाटील ठोंबरे यांना पक्षशिस्तभंगाची नोटीस; अजित पवारांची भेट घेऊन मांडणार भूमिका

दरम्यान, शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये ( 10 th And 12 th Exam 2025 ) परीक्षेचा ताण वाढला असला तरी, मंडळाने केलेल्या नव्या बदलांमुळे चिंता करण्याचे कारण नाही. बोर्डाच्या नव्या नियमानुसार उत्तीर्णतेसाठी लागणाऱ्या किमान गुणांची अट सुलभ करण्यात आली आहे.

Gun Licenses Revoked : गैरवापर करणाऱ्या दोघांचा शस्त्र परवाना रद्द, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची कठोर कारवाई

नवीन नियमांनुसार, दहावीतील त्रिभाषा ( 10 th And 12 th Exam 2025 ) सूत्रात (मराठी, हिंदी, इंग्रजी) एकूण 105 गुणांची अट ठेवण्यात आली आहे. या तिन्ही विषयांपैकी कोणत्याही एका विषयात 25 गुण मिळाले आणि एकूण गुण 105 झाले, तरी विद्यार्थी उत्तीर्ण मानला जाईल. तसेच गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांमध्ये मिळून 70 गुण असतील, तर विद्यार्थी नापास ठरणार नाही. या बदलामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच, परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मंडळाने स्पष्ट केले आहे ( 10 th And 12 th Exam 2025 ) की, परीक्षा कडक नसून निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने घेतली जाईल.

यावर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूपही विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. वस्तुनिष्ठ, उताऱ्यावर आधारित आणि निबंधात्मक प्रश्नांचा समतोल ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तर लिहिणे अधिक सोपे होईल.

परीक्षा जवळ आली असली तरी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने तयारी करावी, असा सल्ला शिक्षक आणि तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. 2025 च्या बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि तयारीचा जोश दिसत ( 10 th And 12 th Exam 2025 ) आहे.

Follow Us On