situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMRDA : पुण्यासाठी पायाभूत सुविधांचा मेगा आराखडा — पीएमआरडीएच्या माध्यमातून ९०० कोटींच्या कामांना लवकरच सुरुवात”

Published On:
PMRDA

Team My Pune City – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( PMRDA) (पीएमआरडीए) पुढील पाच वर्षांत ३३ हजार ७०० कोटी रुपयांच्या खर्चातून २०८ पायाभूत प्रकल्प हाती घेण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या प्रकल्पांद्वारे नागरी सोयीसुविधा, वाहतूक व्यवस्था आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.

पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी माहिती दिली की, या योजनेंतर्गत येत्या काही दिवसांतच ९०० कोटी रुपयांची कामे सुरू होणार आहेत. “औद्योगिक क्षेत्रांचा सर्वांगीण विकास आणि गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण निर्माण करणे हे आमचे प्राधान्य आहे,” असे ते म्हणाले.

उद्योगांना दिलासा – तालुका पातळीवर स्वतंत्र कक्ष सुरू ( PMRDA)

औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत डॉ. म्हसे यांनी सांगितले की, उद्योग आणि व्यावसायिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी पीएमआरडीएने तालुका कार्यालय स्तरावर स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

PMC : पुणे महापालिकेची ‘अभय योजना’; थकबाकीदारांना ७५ टक्के दंडमाफीची संधी

या कक्षात सहायक नगररचनाकार आणि सहायक संचालक पूर्ण वेळ उपलब्ध राहतील, जे बांधकाम परवानग्या, अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर तांत्रिक परवानग्यांशी संबंधित प्रश्न निकाली काढतील. तसेच, तालुका कार्यालयातील अधिकाऱ्यांना अधिक अधिकार देऊन प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यात येईल.

औद्योगिक संघटनांचा सहभाग आणि संवाद वाढवला जाणार ( PMRDA)

या कार्यशाळेत चाकण औद्योगिक असोसिएशन, डेक्कन मेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, वेस्टर्न महाराष्ट्र एमआयडीसी चेंबर असोसिएशन यांसारख्या अनेक औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी चाकण, रांजणगाव, हिंजवडी, तळेगाव आणि पिरंगुट या औद्योगिक क्षेत्रांतील विविध अडचणी आणि विकासाच्या गरजा ( PMRDA) मांडल्या.


Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २४ मतदान केंद्रांची तयारी पूर्ण

पीएमआरडीएने या प्रसंगी आगामी प्रकल्पांचे सादरीकरण करून उद्योजकांना माहिती दिली. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, संचालक (विकास परवानगी व नियोजन) अविनाश पाटील तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

त्रैमासिक बैठकांद्वारे संवाद कायम ठेवणार

उद्योग क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी पीएमआरडीएने दर तीन महिन्यांनी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. “उद्योग क्षेत्र, ग्रामपंचायत, नगरपालिका, एमआयडीसी आणि पीएमआरडीए यांच्या समन्वयातून पायाभूत सुविधा उभारणीस गती दिली जाईल,” असे आयुक्त म्हसे यांनी स्पष्ट केले.

“उद्योजकांसाठी सक्षम वातावरण निर्माण करणे हे ध्येय” ( PMRDA)

“उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करून पीएमआरडीए हद्दीतील औद्योगिक विकासाला गती देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

Follow Us On