Team My Pune City – डेक्कन जिमखाना ते पेठ भाग( Bhide Bridge) जोडणाऱ्या भिडे पुलावर उभारण्यात येणाऱ्या उन्नत पादचारी पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा पूल १५ नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो)ने घेतला आहे.
महामेट्रोचे अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यासाठी ( Bhide Bridge) पुल पुन्हा बंद करण्याचा निर्णय नंतर घेतला जाईल.
भिडे पूल हा शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने त्याच्या बंदीमुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला होता. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी ऑफिसला जाण्या-येण्यासाठी या पुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पूल बंद असल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता. मात्र, डेक्कन, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता यांसारखे मार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी, वादावादी आणि अपघाताच्या घटना ( Bhide Bridge) वाढल्या होत्या.
दिवाळीच्या काळात पुल तात्पुरता खुला करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा बंद करून कामाचा वेग वाढवण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या कामाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
आता पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्याने पुल तात्पुरता खुला करण्यात आला आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी पुन्हा बंद करावा लागणार असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास कायम राहण्याची शक्यता ( Bhide Bridge) आहे.


















