Team My Pune City – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर शार्प शूटरने गोळ्या घालून बंदोबस्त केला. रात्री उशिरा झालेल्या या कारवाईनंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
Janseva Award 2025 : जीवन सुंदर करण्यासाठीअंतर्मनात डोकावण्याची सवय लावा- गणेश शिंदे
हा तोच बिबट्या होता ज्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी वनविभागाची गाडी आणि कार्यालय जाळले, तसेच पुणे–नाशिक महामार्गावर रास्ता रोको करून टायर जाळले. पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर वनविभागाने विशेष मोहीम राबवली. गेल्या तीन दिवसांत दोन बिबट्यांना पिंजऱ्यात पकडण्यात आले असून नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले आहे. सध्या परिसरात 30 पिंजरे लावण्यात आले आहेत.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून जुन्नर आणि शिरूर परिसरातील शेकडो बिबटे पकडून वनतारा येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.


















