Team My Pune City – गुरुवारी दुपारी पवई परिसरात ( Rohit Arya) घडलेल्या धक्कादायक घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. रोहित आर्य नावाच्या आरोपीने ऑडिशनच्या नावाखाली एका स्टुडिओत १५ वर्षांखालील १७ शाळकरी मुलांना आणि दोन पालकांना ओलीस ठेवले होते. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या (Police) मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली. यावेळी, आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली असून पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Jain boarding land case : जैन बोर्डिंग जमीन वादावर तात्पुरता पडदा, राजकीय वादळ मात्र कायम
रोहित आर्य हा पवई परिसरात अभिनय वर्ग आणि ऑडिशनशी संबंधित काम करत होता. सोशल मीडियावर तो स्वतःला फिल्ममेकर आणि मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून सादर करत असे. शिक्षण विभागासाठी ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पात त्याने गुंतवणूक केली होती, परंतु शासनाकडून पैसे न मिळाल्याने त्याचे मोठे नुकसान झाल्याचा त्याचा दावा ( Rohit Arya) होता.
Talegaon Municipal Council : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : प्रारूप मतदार यादीवर तब्बल १,८९१ हरकती
रोहितने व्हिडिओ बनवत स्वत:बद्दल माहिती दिली होती. मी दहशतवादी नाही. माझी पैशाची मागणी केलेली नाही. अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेकवेळा भेटून झाले. 1 मे पासून साधे उपोषण करून देखील अजून आज उद्या असेच होत आहे. त्यामुळे, त्याने हे टोकाचे पाऊल ( Rohit Arya) उचलले .
पोलिसांनी बाथरूममधून प्रवेश करून आत अडकलेल्या सर्व मुलांची आणि पालकांची सुखरूप सुटका केली. एकूण १९ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या ऑपरेशनदरम्यान एक महिला आणि एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार ( Rohit Arya) सुरू आहेत.
आरोपी रोहित आर्य याने छर्ऱ्याच्या बंदुकीतून पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी क्रॉस फायरिंग करत एक राउंडही फायर केला होता. या गोळीबारात आरोपी रोहित आर्या जखमी झाला, उपचारादरम्यान आरोपी रोहितचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी किडनॅपर रोहित आर्यवर गोळीबार केला ( Rohit Arya) होता.


















