Team My Pune City – महाराष्ट्र पोलीस दलात सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या (Maharashtra Police Recruitment) तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यभरात तब्बल १५,६३१ पदांसाठी भरती प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झाली असून, यामध्ये पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन, कारागृह शिपाई आणि एसआरपीएफ अशा विविध पदांचा समावेश आहे.
Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी दहा जणींमध्ये रस्सीखेच
अर्ज प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ती ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी policerecruitment2025.mahait.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. यावर्षी विशेष सवलत देण्यात आली असून, २०२२ ते २०२५ दरम्यान वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही अर्जाची संधी मिळणार (Maharashtra Police Recruitment) आहे.
भरती प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात ५० गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल तर दुसऱ्या टप्प्यात १०० गुणांची लेखी परीक्षा होईल. शारीरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारच लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत आणि लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे बंधनकारक (Maharashtra Police Recruitment) आहे.
शारीरिक आणि लेखी परीक्षेतील गुण एकत्र करून, म्हणजेच एकूण १५० गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार असून, रोजगाराच्या दृष्टीने राज्यातील ही भरती मोहीम महत्त्वाचा टप्पा मानली जात (Maharashtra Police Recruitment) आहे.


















