Team My Pune City – कर्ज मिळवून देतो आणि नोकरीची सोय करतो, असे सांगून मित्राची कागदपत्रे घेऊन त्यांचा गैरवापर केल्याचा ( Nilesh Ghaywal) प्रकार समोर आला आहे. या कागदपत्रांच्या आधारे काढलेले सिमकार्ड नीलेश घायवळ टोळीतील सदस्याने वापरल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. वारजे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल दत्तात्रेय लाखे (रा. धाराशिव) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, सुरेश जालिंदर डेंगळे (वय ३२, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे.
वारजे माळवाडी पोलिसांनी नीलेश घायवळ टोळीविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. तपासादरम्यान डेंगळे यांच्या नावावर असलेला मोबाईल क्रमांक प्रत्यक्षात लाखे वापरत असल्याचे समोर आले. लाखे याने डेंगळे यांच्या कागदपत्रांचा वापर करून सिमकार्ड घेतले होते आणि तो क्रमांक काही बँक खात्यांशी जोडला गेला ( Nilesh Ghaywal) होता.
Talegaon Municipal Council : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : प्रारूप मतदार यादीवर तब्बल १,८९१ हरकती
पोलिसांच्या माहितीनुसार, लाखे आणि डेंगळे हे मित्र आहेत. २०१९ मध्ये लाखे याने “मी तुला शेती व व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो, तसेच नोकरीसाठी माझ्या ओळखींचा उपयोग करतो,” असे सांगून डेंगळे यांची कागदपत्रे घेतली होती. मात्र त्यांचा गैरवापर करून सिमकार्ड काढण्यात आले आणि ते पुढे गुन्हेगारी कारवायांत वापरले ( Nilesh Ghaywal) गेले.


















