Team My Pune City –मालवणी नाटकांचा पाया रचणारे प्रतिभावान ज्येष्ठ प्रसिद्ध नाटककार (Gangaram Gavankar)आणि ‘वस्त्रहरण’नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. दहिसर (पूर्व) येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. सोमवारी रात्री दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्यविश्वाने एक सर्जनशील, लोकभाषेचा प्रामाणिक पुरस्कर्ता गमावला आहे.
गवाणकर यांनी 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते, ही त्यांच्यासाठी मोठी गौरवाची बाब ठरली.
Vadgaon Maval: वारंगवाडी मध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा संपन्न
Jain Boarding Case : जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळ यांचं नाव विनाकारण ओढलं जातंय – देवेंद्र फडणवीस
गवाणकर यांनी ‘वस्त्रहरण’, ‘दोघी’, ‘वनरूम किचन’, ‘वरपरीक्षा’, ‘वर भेटू नका’ अशी अनेक लोकप्रिय नाटके लिहिली. त्यांच्या लेखनातून ग्रामीण बोलींना आणि मालवणी भाषेला नवी ओळख प्राप्त झाली. गंगाराम गवाणकर यांच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाने महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या लेखनातील विनोद, वास्तव आणि संवादशैलीने प्रेक्षकांना जिंकून घेतलं. प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनीदेखील या नाटकाची विशेष प्रशंसा केली होती.




















