Team My Pune City – उच्च परताव्याचे आमिष दाखवून पिंपरीतील ( Pimpri Businessman Fraud) एका व्यावसायिकाची तब्बल ३७ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध, त्यापैकी एका महिलेसह, फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पिंपरीतील एक व्यावसायिक २०२२ साली सिंहगड रोडवरील नांदेड सिटी परिसरात राहणाऱ्या आरोपींशी परिचित झाला. आरोपींनी स्वतःची कंपनी असल्याचे सांगत गुंतवणुकीवर आकर्षक व सातत्यपूर्ण परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने सुमारे ₹२६ लाखांची प्रारंभिक गुंतवणूक ( Pimpri Businessman Fraud) केली.
Maval Taluka NCP : अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी- राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी
सुरुवातीला आरोपींनी सप्टेंबर २०२३ पर्यंत गुंतवणुकीवर नियमित परतावा दिला. मात्र, त्यानंतर त्यांनी पैसे देणे थांबवले आणि अखेर मूळ रकमेचा परतावा देण्यासही टाळाटाळ केली. व्यावसायिकाने वारंवार मागणी करूनही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याची जाणीव होऊन त्याने पोलिसांकडे धाव घेतली. चतुःश्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग केला ( Pimpri Businessman Fraud) आहे.




















