Team My Pune City – खडकी व शिवाजीनगर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाळीव कुत्र्यांनी दोन नागरिकांना चावा ( Dog Bite Cases) घेतल्याच्या दोन घटना घडल्या असून, पोलिसांनी दोन्ही कुत्र्यांच्या मालकांविरोधात निष्काळजीपणाबद्दल गुन्हे नोंदवले आहेत. या घटनांमुळे परिसरात पाळीव प्राण्यांबाबत नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
खडकीतील रेंज हिल्स भागात २६ ऑक्टोबर रोजी रात्री एका तरुणाला पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली. फिर्यादीचा आरोप आहे की, जोसेफ अरुलदास मोझेस (वय ४७, रा. खडकी) यांनी त्यांच्या कारवर दगडफेक केली. या प्रकाराबाबत फिर्यादीने त्यांना जाब विचारल्यावर मोझेस यांनी संतापाच्या भरात आपला पाळीव कुत्रा सोडला. त्या कुत्र्याने फिर्यादीच्या पायावर चावा घेत जखमी केले. यानंतर जखमी तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी मोझेस यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा व सार्वजनिक धोक्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला ( Dog Bite Cases) आहे.
Maval Taluka NCP : अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी- राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी
दुसरी घटना २५ ऑक्टोबरच्या सायंकाळी शिवाजीनगर गावातील समग्र युवक क्रांती मंडळाजवळ घडली. येथे एका तरुणाला पिटबुल जातीच्या कुत्र्याने अचानक पायावर चावा घेत जखमी केले. चौकशीत उघड झाले की, हा कुत्रा अक्षय शेलार (वय ३०, रा. शिवाजीनगर) यांचा पाळीव असून, तो साखळीविना मोकळा फिरत होता. घटनेनंतर जखमी तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ( Dog Bite Cases) आहे.


















