situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

ATS : एटीएसची धडक कारवाई; कोंढव्यातील अभियंत्याला दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून अटक

Published On:
ATS

Team My Pune City – राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ( ATS) सोमवारी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर (वय ३२, रा. कोंढवा) याला अटक केली. तो दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rashi Bhavishya 28 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?


एटीएसने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी आणि खडकी भागात छापे टाकले होते. या कारवाईत १८ जणांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून १९ लॅपटॉप, मोबाईल आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. तपासात जुबेर हंगरगेकर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. छाप्यानंतर तो चेन्नईला गेला होता, मात्र पुण्यात परतताच रेल्वे स्थानक परिसरातून ( ATS) त्याला ताब्यात घेण्यात आले.

State Election Commission: मोठी बातमी -राज्यातील महापालिकांच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर


तपासात असेही समोर आले आहे की, २०२३ मध्ये उघडकीस आलेल्या ISIS-संबंधित कटामध्ये मुंबई, पुणे आणि गुजरातमधील प्रमुख शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा डाव रचला गेला होता. आरोपींनी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील जंगलात बॉम्ब चाचण्या घेतल्या होत्या, तसेच कोंढवा परिसरात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते. या कटाचा संबंध जुबेरशी जोडला गेला ( ATS) आहे.


एटीएसच्या माहितीनुसार, जुबेरच्या लॅपटॉपमधून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, त्याच्या घरातून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. तो अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी न्यायालयात युक्तिवाद करत तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करून जुबेर हंगरगेकरला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले ( ATS) आहेत.

Follow Us On