Team My Pune City – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाच्या (Supriya Sule)नागपूर कार्यालयात एका महिला कार्यकर्तीला लावणी सादर करताना पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट च्या नागपूर शहराध्यक्षांच्या वतीने ‘दिवाळी मिलन कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमादरम्यान पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने दोन गाण्यांवर लावणी सादर केली. कार्यक्रमाच्या वेळी पक्षाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख नेते आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पक्ष कार्यालयात अशा प्रकारचे नृत्य सादर केल्याच्या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Sarangi Mahajan: गोपीनाथ मुंडेंचे वारसदार बीडची जनता – सारंगी महाजन
Sunil Shelke: योग शिक्षक दत्तात्रय भसे यांचे योग विद्येचा प्रचार व प्रसार करणारे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी- आमदार सुनील शेळके
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अतिशय अस्वस्थ करणारा हा व्हिडिओ आहे. हे खूप दुर्दैवी आहे. त्या कुटुंबात देखील आम्ही होतो. तुम्ही शरद पवारांकडून अशा गोष्टी करण्यासाठी पक्ष काढून घेतला. हा पक्ष उभा करण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली आहे. तिथे असे प्रकार करणे अतिशय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


















