Team My Pune City – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दौऱ्यावर (Amit Shah)आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भाजपच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलतांना अमित शाह यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. महाराष्ट्र भाजपसाठी आजचा दिवस शुभ आहे. हे फक्त कार्यालय नसून भाजपसाठी एक मंदिर आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा असे आवाहन अमित शहा यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
अमित शहा म्हणाले , सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी आज शुभ दिवस आहे. महाराष्ट्र भाजप आपल्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन करून एक नवीन सुरूवात करतोय. पक्षाची स्थापना झाल्यापासून छोटे मोठ्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांना माहिती आहे ती कार्यालय हे आपले मंदिर आहे. पक्षाचे सिद्धांत संरक्षित व संवर्धन हे कार्यालयात होतात.
Bhandarkar Institute : भांडारकर संस्थेला “ज्ञान-भारतम्” मिशनमध्ये क्लस्टर सेंटरचा मान
या कार्यालयात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते, बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय हे फक्त काम करण्याचे ऑफिस असेल, मात्र भाजपसाठी कार्यालय म्हणजे मंदिर आहे. आम्ही नेहमीच सिद्धांताच्या आधारे निती घडवली. भारत व भारतीय लोकांच्या हितासाठी कठोर संघर्ष केलाय हे तिन्ही उद्देश ज्या ठिकाणी पूर्ती होते, ते ठिकाण आहे भाजपचे कार्यालय. मी सर्व माजी अध्यक्ष, देवेंद्र फडणवीस व सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. आता भाजप कुठल्या कुबड्यांचा आधार न घेता चालत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप हा एक मजबूत स्वाक्षरी म्हणून दिसतेय.
इमारत पाहून मी मला आनंद झाला. लायब्ररी, कॉन्फरन्स रूम, प्रदेशाध्यक्ष सोबत मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आहे. हे कार्यालय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की येथूनच निवडून जायचे आहे. मला आनंद आहे, महाराष्ट्र भाजप प्रदेशने आपल्या परंपरेला लक्षात ठेवले आहे. जनसंघानंतर भाजप निर्माण झाले, तेव्हा अटलजी बोलले होते, कमळ खिलेगा, तेव्हा आपण पाहिले अटलजी पंतप्रधान झाले. त्यानंतर ११ वर्षे मोदी जी पंतप्रधान आहेत.
ज्या नेत्यांनी कठीण परिस्थितीत पक्ष मजबूत केला, पक्षाचे विचारांचे बीज लावून त्याचे वटवृक्ष केले. त्या सगळ्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना मी मन:पूर्वक प्रणाम करतो. मला ही अध्यक्ष होता आले. माध्यमांना सांगतो की भारतात एकमेव भाजप हा पक्ष आहे, जिथे बुथ प्रमुख हा पक्षाचा देशाचा अध्यक्ष होऊ शकतो. आमचा पक्ष घराणेशाही नुसार चालत नाही. ज्यामध्ये क्षमता आहे तोच याठिकाणी मोठा नेता होता. आम्ही हे सिद्ध केले की घराणेशाही या देशात चालणार नाही. तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावा लागेल.


















