Team My Pune City – यंदाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्याच्या( Pandharpur) पार्श्वभूमीवर पंढरपूरात तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक पंढरीत दाखल होत असून, २६ ऑक्टोबरपासून ते ९ नोव्हेंबरदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
Pune Crime News : ज्येष्ठाला बोलण्यात गुंतवून ७८ हजारांची अंगठी चोरट्याने लांबवली
या कालावधीत श्रींचा पलंग काढण्यात आल्याने काकडा आरती, धूपारती, पोशाख, शेजारती आणि राजोपचार बंद राहतील. मात्र, नित्यपूजा, गंधाक्षता आणि महानैवेद्य हे विधी सुरू राहतील. दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना विठुरायाचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या ( Pandharpur) आहेत.
Talegaon Dabhade News : अविस्मरणीय अनुभूती देणाराएक आगळावेगळा उपक्रम!;रोटरी सिटीचा गेट टुगेदर!
यात्रेदरम्यान भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा आणि व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. मंदिराशी संबंधित सर्व परंपरा आणि प्रथा काटेकोरपणे पाळल्या जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. यात श्रींचा पलंग काढणे, महानैवेद्य, पादुकांची मिरवणूक, एकादशीच्या पूजा, महाद्वार काला आणि प्रक्षाळपूजा यांचा समावेश आहे.पंढरपूरात कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविकांचा ओघ अपेक्षित असून, अखंड दर्शनाची सुविधा आणि परंपरेचे पालन यामुळे यंदाचा सोहळा अधिक शिस्तबद्ध आणि भक्तिमय होणार ( Pandharpur) आहे.


















