Team My Pune City –दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून एका (Pune)तरुणाने ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली. नागरिकांच्या तत्परतेने हा दारुड्या तरुण पकडला गेला आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
अटक केलेल्याचे नाव रोशन श्याम मोरे (वय २६, रा. जय जवाननगर, येरवडा) असे आहे.
याबाबत फिर्याद रेहमान नसरुद्दीन अंसारी (वय ६२, रा. सुरक्षानगर, आंबेडकर चौकाजवळ, येरवडा) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहमान अंसारी हे प्लंबर असून, २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिरण्यासाठी बाहेर पडले होते. ते आंबेडकर चौकातून घरी परतत असताना अग्निशमन केंद्राजवळ आरोपी रोशन मोरे त्यांच्या जवळ आला आणि दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. अंसारी यांनी नकार दिल्यावर आरोपीने संतापाच्या भरात रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला.
Talegaon Dabhade: तळेगावातील सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!
Pune : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रामटेकडी येथे फटाके फोडण्यावरून हाणामारी; एकाचा मृत्यू, एक आरोपी अटक
या हल्ल्यात अंसारी यांच्या कपाळाला जखम होऊन रक्तस्त्राव झाला. घटनेदरम्यान रस्त्याने जाणारे नागरिक मदतीला धावले आणि आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले.याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार गवळी या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.


















