Team My Pune City – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात उद्घाटन ( Bhandarkar Institute) केलेल्या “ज्ञान-भारतम्” मिशनशी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा सामंजस्य करार नुकताच नवी दिल्ली येथे झाला. केंद्र सरकारच्या संस्कृति मंत्रालयाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Adv. Satish Gorde : नशामुक्त भारत ही काळाची गरज- ॲड. सतिश गोरडे
हा करार पाच वर्षांसाठी असून, त्याद्वारे भांडारकर संस्थेला क्लस्टर सेंटरचा ( Bhandarkar Institute) दर्जा देण्यात आला आहे. या अंतर्गत संस्थेला स्वतःच्या संग्रहाबरोबरच इतर संस्था व व्यक्तींकडील हस्तलिखितांची नोंदणी, जतन, डिजिटायझेशन, भाषांतर, प्रकाशन आणि संशोधन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.केंद्रीय संस्कृति मंत्रालयाच्या वतीने सहसचिव समर नंदा आणि भांडारकर संस्थेच्या वतीने नियामक परिषदेचे सदस्य मनोज एरंडे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. संस्थेचे निबंधक डॉ. श्रीनन्द बापट हे या वेळी उपस्थित होते.
मिशनचे उद्दिष्ट
केंद्रीय संस्कृति मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले की, देशातील एक कोटी हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करून ते अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. भांडारकर संस्थेच्या आजवरच्या कार्याची त्यांनी विशेष दखल घेतली.
संस्कृति विभागाचे सचिव विवेक आगरवाल यांनी स्पष्ट केले की, चालू आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या या योजनेची अंमलबजावणी आता सुरू होत असून, लवकरच तपशीलवार कार्ययोजना जाहीर केली ( Bhandarkar Institute) जाईल.
राष्ट्रीय स्तरावरील मान्यता
देशभरातील एकूण १२ संस्थांना क्लस्टर सेंटरचा दर्जा देण्यात आला असून, त्यामध्ये भांडारकर संस्थेचाही समावेश आहे. त्यामुळे पुण्यातील या संस्थेला राष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वपूर्ण मान्यता ( Bhandarkar Institute) मिळाली आहे.


















