Team My Pune City – ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुणेकरांना(Pune) पुन्हा एकदा पावसाचा अनुभव येणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच ग्रामीण भागात वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान खात्याने जाहीर केलेल्या अंदाजानुसार —
२७ ऑक्टोबर (सोमवार): सकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील; दुपारनंतर ते सर्वसाधारणपणे ढगाळ होईल. या काळात विजांचा कडकडाट, गडगडाटी वादळे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२८ ऑक्टोबर (मंगळवार): सकाळी आकाश मुख्यतः स्वच्छ राहील; दुपारनंतर अंशतः ढगाळ होऊन पुन्हा विजांच्या चमकांसह हलका पाऊस होण्याचा अंदाज.
२९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर: आकाश मुख्यतः स्वच्छ राहणार असून दुपारनंतर किंचित ढगाळ वातावरण अपेक्षित आहे.
शनिवारी आणि रविवारी झालेल्या सायंकाळच्या सरींमुळे पुणे, चिंचवड, दौंड, भोर, लोनावळा परिसरात गारवा पसरला होता. चिंचवड येथे २१ मि.मी., शिवाजीनगर येथे १२.७ मि.मी., आणि एन.डी.ए. येथे ९ मि.मी. पावसाची नोंद झाली, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी नागरिकांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. वीजांचा कडकडाट आणि वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खुल्या जागेत जाणे टाळावे, मोबाइलवर हवामानाच्या सूचना लक्षात घ्याव्यात आणि वाहनचालकांनी वेग मर्यादित ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Pune : पुणे जैन बोर्डिंग प्रकरणात दोन दिवसांमध्ये तोडगा काढून देतो, शिंदेंचं धंगेकरांना मोठं आश्वासन
Vadgaon Maval: ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा’!-मावळ तालुक्यात भक्तीमय वातावरणात काकड आरती सोहळा
दिवाळीनंतर वाढलेल्या तापमानामुळे निर्माण झालेला उकाडा कमी होऊन वातावरणात गारवा येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे रब्बी पिकांसाठीही जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होणार आहे.


















