Team My Pune City –पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून (Pune )शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आहेत. त्यानंतर पुण्याचे वातावरण तापले आहे . आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना रवींद्र धंगेकर यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी महायुतीमध्ये दंगा करायचा नाही असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिला. तसेच आता जैन बोर्डिंगचा विषय संपला आहे, त्यांना जी माहिती मिळाली होती, त्यावरून ते बोलत होते, असंही यावेळी शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या भेटीनंतर आता रवींद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
धंगेकर म्हणाले ,दोन दिवसांमध्ये तोडगा काढून देतो, जैन बोर्डिंग मुक्त होणार असं त्यांनी मला सांगितलं आहे, त्यासाठी मी शिंदे साहेबांचे आभार मानतो. कार्यकर्ता म्हणून माझी लढाई कधीही संपणार नाही, जर वाईट प्रवृत्ती विरुद्ध लढलो नाही तर पुढची पिढी मला माफ करणार नाही, कायम जनतेच्या बाजूने लढणार, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, रवीद्र धंगेकर हा कार्यकर्ता गप्प बसणार नाही, उद्या कुठे कुणावर अन्याय होत असेल आणि मुरलीधर मोहोळ पुन्हा आले तर मी पुन्हा लढणार, लोकशाहीमध्ये मला एखादा प्रश्न जर वाटला तर मी नक्की मुरलीधर मोहोळ यांना विचारणार.
Talegaon Dabhade: तळेगावातील सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!
Pune : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रामटेकडी येथे फटाके फोडण्यावरून हाणामारी; एकाचा मृत्यू, एक आरोपी अटक
ते पुढे म्हणाले की, या विषयासंदर्भात शिंदे साहेबांना भाजपचे काही कार्यकर्ते भेटले असतील, मुरलीधर मोहोळ देखील भेटले असतील, मला याचं समाधान वाटतं की ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले, आणि त्यांना सांगितलं की याला गप्पा बसवा म्हणून, धंगेकरांना का गप्प करायचं? तर आपल्याला माहिती आहे एखादं बाळ रडत असेल तर आई-वडिलांना कळतं की बाळाला काय हवं आहे? ते त्याला खायला देतात, त्यामुळे मी जैन मंदिर होत नाही तोपर्यंत रडायचं थांबणार नाही, जैन मंदिर माझ्यासाठी औषध आहे, आणि मी रडत राहणार त्यांच्यापाशी, कारण मला जैन मंदिर हवं आहे, असंही यावेळी धंगेकर यांनी म्हटलं आहे.




















