दिप्ती भोगले लिखित तीन संगीत नाटकांच्या पुस्तकांचे प्रकाशन
नाटकाचे संस्कार रुजविण्याचे शिलेदारांचे कार्य निष्काम कर्मयोग : उल्हास पवार
Team My Pune City –मनात सकारात्मकता नसेल तर माणूस घडू शकत (Pune)नाही. क्रांती, परिवर्तन, माणसे घडविणे, नवीन पिढी घडविणे असे शब्द राजकारणी वापरतात; परंतु हे सगळे झूट आहे. प्रामाणिक माणसे, माध्यमे समाज घडवित असतात. समाज घडविणाऱ्यांपैकी दिप्ती भोगले या एक असून त्यांचा उल्लेख खऱ्या अर्थाने अमृतकुंभ असा केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार उल्हास पवार यांनी केले.
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका अभिनेत्री दिप्ती भोगले लिखित संगीत नादलुब्ध मी, संगीत चंद्रमाधवी आणि संगीत स्वरविभ्रम या तीन संगीत नाटकांच्या पुस्तकांचे प्रकाशन आज (दि. 26) उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ ग्रंथपाल, संदर्भतज्ज्ञ प्रसाद भडसावळे, ज्येष्ठ गायिका अभिनेत्री वर्षा जोगळेकर मंचावर होते. दिप्ती भोगले यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त मराठी रंगभूमी, पुणेतर्फे पत्रकार भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुहृदांच्या शुभेच्छा, सदिच्छा पाठीशी असल्या की प्रेरणा आणि नवीन कार्य करण्याचे बळ मिळते असे सांगून उल्हास पवार पुढे म्हणाले, संगीत रंगभूमीची वाटचाल प्रेरणादायी आहे. शिलेदार कुटुंबियांनी नव्या पिढीवर संगीत नाटकाचे संस्कार रुजविण्यासाठी कार्य निष्काम कर्मयोग्याप्रमाणे केले आहे.
दिप्ती भोगले म्हणाल्या, कार्याच्या बाबतीत मी स्वत:ला जातीवंत लक्ष्मीधर समजते. नाना, आई आणि आजोबा यांनी संगीत नाटकाला वाहिलेली रंगभूमी तयार केली. जन्मापासून वयाच्या आठव्या वर्षापर्यंत नाट्यसंगीतच माझ्या कानी आले. मला आता देवाकडे असे मागायचे आहे की, या जन्माची कर्तव्यपूर्ती करण्यासाठी देवाने मला याच जन्माचा एक तरी वन्स मोअर द्यावा.
प्रसाद भडसावळे म्हणाले, संगीत रंगभूमीचा ध्यास असलेल्या कुटुंबात जन्म झालेला असल्यामुळे दिप्ती भोगले यांच्यावर नाटकाचेच संस्कार झाले. पूर्वीच्या काळी पुरुषांनी स्त्री भूमिका केलेल्या आहेत, पण दिप्ती भोगले यांच्या वाटाल्या पुरुषांच्याच व्यक्तीरेखा अधिक आल्या आहेत. त्यांनी संगीत नाटकांपुरताच अभ्यास मर्यादित ठेवला नाही तर भाषिक सौंदर्यावरही मोठे काम केले आहे.
Crime News: एस.टी. बस प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरणार्या 3 महिला जेरबंद
Talegaon Dabhade: तळेगावातील सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!
अतुल खांडेकर, सुदीप सबनीस, निनाद जाधव, चिन्मय जोगळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात नांदीने झाली. अमृतमहोत्सवानिमित्त दिप्ती भोगले यांना तीन पिढ्यातील कलाकारांनी औक्षण केले. मान्यवरांचे स्वागत प्रसाद भडसावळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा जोगळेकर यांनी केले तर आभार वैभवी जोगळेकर यांनी मानले. ज्येष्ठ गायिका अभिनेत्री मधुवंती दांडेकर, प्रतिभा भडसावळे आदींनी दिप्ती भोगले यांना शुभेच्छा दिल्या.



















