स्वरमयी गुरुकुल आयोजित मैफलीत पंडित मिलिंद शेवडे यांचे सुमधुर बासरीवादन
Team My Pune City –नादमधुर, शांत, संयमी बासरी वादनातून रसिकांना आज अनोख्या भावानुभूतीचा आनंद मिळाला.
निमित्त होते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित (Pune)स्वरमयी गुरुकुलतर्फे बासरीवादक पंडित मिलिंद शेवडे यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय बासरी वादनाच्या मैफलीचे. मासिक स्वरमयी बैठकीअंतर्गत आज (दि. 26) या मैफलीचे आयोजन स्वरमयी गुरुकुल सभागृह, शिवाजीनगर येथे करण्यात आले होते.
पंडित मिलिंद शेवडे यांनी बासरी वादन मैफलीची सुरुवात राग बिलासखानी तोडीतील आलाप, जोड, मध्य विलंबित तीनताल आणि मध्यलय एकतालातील गत ऐकवून केली. राग शुद्ध सारंग सादर करताना विलंबित झपताल व तीनताल वादनातील प्रभुत्व दर्शविले. राग पिलूमधील धून सादर करून पंडित शेवडे यांनी रसिकांना वेगळ्या भावविश्वाची सुरेल सफर घडवून आणली. मैफलीची सांगता मिश्र भैरवीने करताना पंडित शेवडे यांनी गुरुकृपेतून मिळालेल्या ज्ञानातून वादनात आलेली भावोत्कटता दर्शवित रसिकांना संमोहित केले. पंडित माधव मोडक यांनी तबल्यावर संयमित व समर्पक साथसंगत करून मैफलीत रंग भरले.
Crime News: एस.टी. बस प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरणार्या 3 महिला जेरबंद
Talegaon Dabhade: तळेगावातील सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!
गुरू माँ अन्नपूर्णा देवी यांच्याशी झालेली भेट, त्यांच्याकडून ज्ञानप्राप्तीची निर्माण झालेली आस आणि सुमारे नऊ वर्षांपेक्षा अधिक काळ लाभलेले मागदर्शन अशी वाटचालही पंडित मिलिंद शेवडे यांनी सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या फूमी नेगिशी यांनी केले तर कलाकारांचा सत्कार डॉ. अश्विनी वळसंगकर यांनी केला.



















