Team My Pune City –दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर एस.टी. बसस्थानकांवर वाढलेल्या (Crime News) गर्दीचा गैरफायदा घेत प्रवाशांच्या पर्स ,पाकिटांवर डल्ला मारणाऱ्या तिन्ही महिलांना गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने अटक केली आहे.
आशा देविदास लोंढे (वय ६०), रेखा मनोहर हातागंळे (वय ३५) आणि हेमा दिगंबर हातागंळे (वय ४१) अशी आहेत. त्यांच्याकडून १ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा ४ लाख १२ हजार २३४ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या सर्व महिला लोणी काळभोर येथील रेल्वे स्टेशन परिसरात राहतात.
गुन्हे शाखेचे युनिट ४ चे पथक खडकी परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रविण राजपूत आणि संजय आढारी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वाकडेवाडी पीएमपी बसस्टॉपवर तीन महिला बसमधील प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरी करण्याच्या तयारीत आहेत.
पोलिसांनी तत्काळ वाकडेवाडी येथे जाऊन तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी नाशिक ते इस्लामपूर एस.टी. बस प्रवासादरम्यान मोरेबाग ते मांगडेवाडी दरम्यान एका प्रवासी महिलेची पर्स चोरी केल्याची कबुली दिली.
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणी मोहोळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Talegaon Dabhade: तळेगावातील सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!
त्यांच्याकडून सव्वा चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. भारती पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी त्यांना भारती विद्यापीठ पोलिसांच्या हवाली केले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, अंमलदार प्रविण राजपूत, हरीष मोरे, एकनाथ जोशी, संजय आढारी, प्रविण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, भरत गुंडवाड, मयुरी नलावडे यांनी केली.




















