Team My Pune City – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती (Dagdusheth Ganpati)ट्रस्टतर्फे कार्तिक शुद्ध चतुर्थीच्या निमित्ताने श्री उमांगमलज जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या सोहळ्यात गणरायाला ११०० श्रीफळांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. गाणपत्य संप्रदायात या दिवशी श्रीफळ अर्पण करण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मध्यरात्री दिल्ली दौरा; मोदी -शहांची भेट घेणार
‘उमांगमलज’ ही संकल्पना अंतःकरणातील (Dagdusheth Ganpati)अहंकार आणि ममत्वाचे आवरण दूर झाल्यानंतर मिळणाऱ्या शुद्ध, स्वच्छ आणि शांत परमात्मदर्शनाशी जोडली जाते. त्यामुळे या दिवशी श्रीफळ समर्पण हे आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते.
Maval: पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळू आखाडे यांची निवड
मंदिरात या निमित्ताने विविध (Dagdusheth Ganpati) धार्मिक विधी पार पडले. पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सूक्त पठण झाले. त्यानंतर पहाटे चार वाजता गायिका शेफाली कुलकर्णी-साकुरीकर यांनी भक्तिगीतांचे सादरीकरण केले. सकाळी आठ वाजता गणेश याग संपन्न झाला.
या सर्व कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ (Dagdusheth Ganpati) घेतला.


















