Team My Pune City –पुण्यातील कोरेगाव पार्क (Pune Crime news) परिसरात फटाके वाजवण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे ओंकार बसूराज कोळी (२६) आणि शुभम बसूराज कोळी (२६, रा. दरवडे मळा, कोरेगाव पार्क) अशी आहेत. पीडित(Pune Crime news) तरुणाने याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Shri Kshetra Bhandara: श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला होणार यावर्षीचा माघ शुद्ध दशमी सोहळा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास तक्रारदार तरुण आणि त्याचे मित्र घरासमोर उभे होते. त्याच वेळी आरोपी ओंकार आणि शुभम घरासमोर फटाके फोडत होते. यावरून वाद निर्माण(Pune Crime news) झाला.
वाद वाढताच आरोपींनी तक्रारदार तरुण, त्याची आई आणि मित्राला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर त्यांनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला.या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक हंडाळ पुढील तपास (Pune Crime news) करत आहेत.


















