Team My Pune City – आमदार रोहित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी देहूयेथे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.जगद्गुरू संत तुकोबांच दर्शन घेऊन रोहित पवारांनी उपोषणाला सुरुवात केली. वारकरी आघाडीचे प्रमुख दत्ता महाराज दोन्हे पाटील हे रोहित पवारांसोबत उपोषणाला बसले आहेत.
जगद्गुरू संत तुकोबांच्या प्रवेशद्वारा समोर रोहित पवार यांनी उपोषणाला(Rohit Pawar) सुरुवात केली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज कर्जमाफी योजनेचा प्रस्ताव रोहित पवार सरकार ला देणार आहेत.
शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जनावरांसह, शेती वाहून गेली आहे. यासाठी राज्य सरकारने ३२ हजार कोटींच पॅकेज जाहीर केले होते. यावरून राजकारण तापले होते. आता आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Wanawadi Police : वानवडी पोलिसांकडून कोंबड्यांच्या झुंजींवर धाड – सहा जणांना अटक, सुमारे ५ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त
Pune Metro : लक्ष्मीपूजेनिमित्त पुणे मेट्रोच्या सेवा वेळेत बदल; मंगळवारी सायंकाळी सहानंतर सेवा बंद
शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करण्यात यावी ही पक्षाची आग्रही मागणी आहे. अस रोहित पवार म्हणाले आहेत.