Team My Pune City – आगामी लक्ष्मीपूजा सणानिमित्त ( Pune Metro) पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेट्रो सेवा केवळ सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच सुरु राहणार आहे. सायंकाळी ६ नंतर ते रात्री ११ वाजेपर्यंत सर्व मेट्रो सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.
Fire News : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्यात आग; रहिवासी सुरक्षित, अग्निशमन दलाची तत्पर कारवाई

मेट्रो प्रशासनाने या बदलाची घोषणा करताना प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल ( Pune Metro) दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी नागरिकांना आपल्या प्रवासाचे नियोजन या बदलानुसार करण्याचे आवाहन केले आहे. लक्ष्मीपूजा हा सण शहरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असल्याने मेट्रो कर्मचाऱ्यांनाही सणासुदीचा आनंद घेता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Rashi Bhavishya 20 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
साधारणपणे पुणे मेट्रो सेवा दररोज सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरु असते. मात्र, सणाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसासाठी या वेळेत बदल करण्यात आला असून, बुधवार दिनांक २२ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रकानुसार म्हणजेच सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रो सेवा पुन्हा सुरु होतील.
दरम्यान, प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर व वेळेवर सेवा देण्यासाठी पुणे मेट्रो प्रशासन सतत प्रयत्नशील असल्याचेही स्पष्ट करण्यात आले ( Pune Metro) आहे.