situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

MPSC 2026 : MPSC २०२६ परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Published On:
MPSC Exam

Team My Pune City – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, गट ब आणि गट क अशा महत्त्वाच्या परीक्षांचा समावेश आहे. हे वेळापत्रक शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकावर आधारित असून, अंदाजित स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Mumbai-Pune Expressway : दिवाळीच्या सुट्टीमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गर्दीने वाहतूक कोलमडली


जाहीर वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा ५ ते ९ मे २०२५ दरम्यान होणार असून, निकाल ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा १६ मे रोजी होणार असून, त्यांचे निकालही ऑगस्टमध्ये जाहीर होतील. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा १७ मे रोजी होणार असून, निकाल सप्टेंबर २०२६मध्ये जाहीर करण्याचे नियोजन आहे.

Talegaon Dabhade: संध्यासूरांत न्हाली ‘इंद्रायणी’ ची दिवाळी


महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ७ जून रोजी होणार असून, निकाल सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी होणार असून, त्याचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर केला जाईल. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा तपशील स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे.


राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ ही ३ ते २४ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येणार असून, निकाल ऑगस्ट २०२७मध्ये जाहीर होईल. विद्युत अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १५ नोव्हेंबर रोजी होणार असून, निकाल फेब्रुवारी २०२७मध्ये अपेक्षित आहे.


महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १४ जून रोजी होणार असून, निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर केला जाईल. त्यानंतर मुख्य परीक्षा ५ डिसेंबर रोजी होणार असून, निकाल एप्रिल २०२७मध्ये प्रसिद्ध केला जाईल. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १२ जुलै रोजी होणार असून, निकाल नोव्हेंबरमध्ये जाहीर होईल. मुख्य परीक्षा १३ डिसेंबर रोजी होणार असून, निकाल एप्रिल २०२७मध्ये अपेक्षित आहे.
एमपीएससीने स्पष्ट केले आहे की हे वेळापत्रक अंदाजित असून, परीक्षेच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. परीक्षेची योजना, अभ्यासक्रम आणि निवडपद्धती यासंबंधीचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अद्ययावत केला जाईल.

Follow Us On