Team My Pune City –दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी ( Mumbai-Pune Expressway) मोठ्या संख्येने मुंबईकरांनी शनिवारी सकाळपासूनच प्रवास सुरू केल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. विशेषतः पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे बोरघाट परिसरात सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सलग सुट्ट्यांचा लाभ घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणावर अलिबाग, लोणावळा, पुणे आदी ठिकाणी निघाले होते. त्यामुळे सकाळपासूनच महामार्गावर वाहनांची गर्दी वाढत गेली. बोरघाटात वाहने अत्यंत संथ गतीने सरकत होती. काही वाहनं बंद पडल्यामुळे कोंडी अधिकच ( Mumbai-Pune Expressway) गंभीर झाली.
Talegaon Dabhade: संध्यासूरांत न्हाली ‘इंद्रायणी’ ची दिवाळी
खालापूर टोल नाक्यावर सकाळी ९ वाजल्यापासून आठ किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. एरव्ही १० मिनिटांत पार होणारे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना एक ते दीड तास लागला. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील होती, मात्र वाहनांची प्रचंड संख्या लक्षात घेता नियमन करणे आव्हानात्मक ठरत होते.सायंकाळनंतर वाहनांची संख्या कमी होण्याची ( Mumbai-Pune Expressway) शक्यता व्यक्त करण्यात आली.